पद्मिनी कोल्हापूरे यांचे पणजोबा गणेशभट नवाथे अभिषेकी हार्डीकर
पद्मिनी कोल्हापूरे यांचे पणजोबा गणेशभट नवाथे अभिषेकी हार्डीकर
(गोव्याच्या मंगेशी देवस्थानचे पिढीजात पुजारी) यांना येसूबाई राणे या देवदासीपासून झालेला पुत्र म्हणजे दीनानाथ मंगेशकर. गणेशभटांना लग्नाच्या बायकोपासून झालेला पुत्र बळवंत अभिषेकी. गणेशभटांचे जामात हे कृष्णराव कोल्हापूरे. दीनानाथ मंगेशकर आणि कृष्णराव कोल्हापुरे (म्हणजेच पद्मिनी कोल्हापुरेचे आजोबा) यांनी बळवंत संगीत नाटक मंडळी स्थापन केली होती. या नाटक मंडळीने सावरकरांची नाटके रंगमंचावर आणली होती. दीनानाथ व शेवंती यांच्या कन्या लता आशा उषा आणि मीना या पद्मिनी कोल्हापुरेच्या मामेआत्या आहेत. जितेंद्र अभिषेकी व हृदयनाथ हे पद्मिनी कोल्हापुरेचे काका (वडलांचे मामेभाऊ) आहेत.पद्मिनीचे वडील पं.पंढरीनाथ कोल्हापूरे हे शास्त्रीय गायक होते. पद्मिनी ची मोठी बहीण शिवांगी हिने शक्ती कपूरशी विवाह केला आहे. श्रद्धा कपूर ही तिची भाची आहे. पद्मिनी कोल्हापुरे ची लहान बहिण तेजस्विनी कोल्हापुरे हिने पंकज सारस्वत यांच्याशी विवाह केला आहे. तिला वेदिका नावाची मुलगी आहे. मीना मंगेशकर यांचा मुलगा योगेश खडीकर आणि जितेंद्र व विद्या अभिषेकी यांची मुलगी मेखला अभिषेकी यांचा विवाह झालेला आहे. त्यांना सांजली नावाची मुलगी आहे.मीनाची मुलगी रचना हिने जयदीप शाहशी विवाह केला आहे. जितेंद्र अभिषेकीच्या मुलाचे नाव शौनक अभिषेकी आहे. हृदयनाथ मंगेशकर ला राधा नावाची मुलगी आणि आदिनाथ आणि वैजनाथ या नावाची मुले आहेत. शौनक अभिषेकीला अभेद अभिषेकी नावाचा मुलगा आहे. पद्मिनी कोल्हापुरे ची आई निरूपमा कोल्हापुरे ही हवाई सुंदरी होती. आशा भोसले चा मुलगा आनंद याला जनाई नावाची मुलगी आहे. रानजाई नावाचा मुलगा आहे.आता योगायोग पहा गणेश भट या एकाच माणसाचे बळवंत अभिषेकी व दीनानाथ मंगेशकर हे दोन मुले आणि पद्मिनी कोल्हापुरी ची आज्जी हे तिसरे अपत्य होय. लता मीना आशा उषा हृदयनाथ जितेंद्र अभिषेकी आणि पंढरीनाथ कोल्हापुरे हे सर्वजण गणेश भटचे नातवंडे होत. योगेश खडीकर , रचना शाह,वर्षा भोसले, हेमंत भोसले, आनंद भोसले, शौनक अभिषेकी शिवांगी ,पद्मिनी आणि तेजस्विनी कोल्हापुरे हे सर्व गणेश भट यांचे पणतवंडे आहेत. सांजली खडीकर, अभेद अभिषेकी, जनाई भोसले,रानजाई भोसले, वेदिका सारस्वत आणि प्रियांश (पद्मिनी) कोल्हापुरे-शर्मा, श्रद्धा(शिवांगी व शक्ती) कपूर, सिद्धान्त शक्ती कपूर हे सर्व गणेश भट यांचे खापरपणतवंडे आहेत. हृदयनाथ मंगेशकर यांची पत्नी भारती ही दामुअण्णा मालवणकर यांची कन्या होय. आशा मंगेशकर यांनी लता मंगेशकर यांचे स्वीय सचिव गणपतराव भोसले यांच्याशी गांधर्व विवाह केला होता. गणपतराव भोसले यांच्या मृत्यूनंतर आशा भोसले यांनी राहुलदेवबर्मन यांच्याशी विवाह केला. येसूबाई राणे या उत्तम नर्तिका व गायिका होत्या. त्यांची देवदासी परंपरा कायम ठेवत लता, उषा व राधा अविवाहित राहिल्या. आदिनाथ मंगेशकर यांच्या पत्नीचे नांव कृष्णा मंगेशकर आहे. हे सर्वच गायक आहेत.
Comments
Post a Comment