"Bombay Scottish"

"Bombay Scottish" 

 राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ह्यांची मुलं ज्या शाळेत शिकली त्या "Bombay Scottish" शाळेत आजही  मराठी तिसऱ्या क्रमांकावर आहे.. याचा जाब स्वयंघोषित मराठीचे कैवारी ठाकरे बंधू विचारणार का.. ?


महाराष्ट्राची राजधानी मुंबई. इथेच असलेली बॉम्बे स्कॉटिश स्कूल ही शाळा आजही 'Bombay' नाव वापरत आहे, आणि याहीपेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे मराठी भाषेला या शाळेत 'तिसऱ्या क्रमांकाची भाषा' म्हणून शिकवले जाते. ही शाळा इंग्रजी माध्यमात असून, हिंदी आणि फ्रेंच दुसऱ्या भाषा म्हणून शिकवल्या जातात, तर मराठीला तिसऱ्या भाषेचा दर्जा देऊन फक्त इयत्ता 1 ली ते 7 वीपर्यंतच शिकवले जाते. हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि मराठी भाषेच्या अधिकारांचा सरळ अपमानच म्हणावा लागेल, हे विशेष नमूद करावे लागेल की या शाळेत राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनीही शिक्षण घेतले आहे हीच शाळा मराठी भाषेला तृतीय स्थान देत असल्याचे पाहून, महाराष्ट्रप्रेमाची आणि भाषाभिमानाची मोठमोठाली भाषण करणाऱ्या या नेत्यांनी यावर कधीच जाहीर आक्षेप घेतलेला नाही, ही गोष्ट लक्षात घेणीय आहे. मग मराठी माणसांचा खरा आवाज कोणी उठवायचा?1995 मध्ये मुंबईचे पूर्वीचे 'Bombay' नाव अधिकृतपणे बदलून 'मुंबई' केले. पण आश्चर्य म्हणजे या शाळेच्या नावात अजूनही "Bombay" आहे! आजही वेबसाइट आणि सर्व दस्तऐवजांत 'Bombay Scottish' असंच लिहिलं जातं. ही शाळा महाराष्ट्रात असून, इथल्या लोकांचा इतिहास, संस्कृती आणि अस्मिता यांना मान देण्याऐवजी ही शाळा आजही 'ब्रिटीश' काळाची आठवण ठेवत स्वतःला श्रेष्ठ समजते. यावर उबाठा कींवा मनसेनेचा एकही नेता किंवा कार्यकर्ता आवाज उठवत नाहीत, ही खेदाची बाब आहे. आणि विशेष म्हणजे, याच शाळेतील विद्यार्थी आज मराठी बोलायलाही कचरतात कारण त्यांना शिकवलेच जात नाही. महाराष्ट्र शासनाने 2020 मध्ये निर्णय घेतला की कोणतीही शाळा असो, मराठी विषय हा सर्वांसाठी अनिवार्य असावा आणि तो 10 वीपर्यंत शिकवावा. पण बॉम्बे स्कॉटिश शाळा फक्त 7 वीपर्यंत मराठी शिकवते आणि नंतर तो विषय बंद केला जातो. ही कायद्याची सरळ पायमल्ली आहे. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे, अभिमान आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा असो वा इंटरनॅशनल बोर्ड, मराठी भाषेला तृतीय स्थान देणं म्हणजे इथल्या मातीतल्या अस्मितेचा अपमान आहे. राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, आणि शिक्षण विभागाने यावर तात्काळ पावलं उचलली पाहिजेत. आज प्रश्न असा आहे की ही शाळा 'Bombay Scottish' का राहावी? 'Mumbai Marathi Mandir' का नको ? शाळांची गुणवत्ता भाषेवर नाही, पण संस्कृतीवर आधारित असावी. भाषा शिकवणं वाईट नाही, पण मराठीला तिसऱ्या क्रमांकावर ठेवणं अपमानकारक नक्कीच आहे..


मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही. शाळा कितीही मोठी असली तरी तिचं नाव आणि धोरणं महाराष्ट्राच्या संस्कृतीशी नक्कीच जुळणारी असली पाहिजेत. 🚩

Comments

Popular Posts