स्वातंत्र्यवीर...
स्वातंत्र्यवीर...
१९३७ साली सावरकरांची स्थानबद्धतेतून सुटका झाली..आणि पुण्यातील त्यांच्या अनुयायांनी त्यांचा भव्य सत्कार आयोजित केला..ब्रिटिशांच राज्य होतं..कॅांग्रेसने भूमिका घेतली की सरकारी शिक्षा भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करणे योग्य नाही..आणि फतवा काढला की सत्कार झालाच तर कॅांग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळी निषाणे दाखवून निषेध करावा..पुण्यात कॅांग्रेसचं प्राबल्य होतं..सावरकर अनुयायी हवालदिल झाले..सत्कारसभेत बोलायला बोलवायचं कोणाला ?..सावरकरांनी सांगितलं की फक्त एक प्रिन्सिपॅाल अत्र्यांना बोलवा..बाकी कुणीही चालेल..
सभेला प्रचंड गर्दी होती..कॅांग्रेसची काळी निशाणं डोकं वर काढायला लागली..अत्रे उभे राहिले आणि गरजले...
..दोन काळ्या पाण्याच्या शिक्षा भोगलेला हा वीरपुरुष तुमच्यासमोर बसला आहे..तो काय ह्या दीडदमडीच्या काळ्या कारस्थानांना घाबरणार ?...
..सभेत एकच एल्गार उसळला..कॅांग्रेसचे कार्यकर्ते काळी निशाणं लपवून मागच्या मागे पळून गेले...
..ह्याच सभेतील आपल्या भाषणात अत्र्यांनी विनायक दामोदर सावरकर यांना ‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी बहाल केली...
..यानंतर काही दिवसांनी गोखले काॅलेजमध्ये प्रिन्सिपॅाल प्रल्हाद केशव अत्रे ह्यांचा सत्कार होता..साहजिकच स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या हस्ते..
..ह्याच सभेतील आपल्या भाषणात सावरकरांनी प्रल्हाद केशव अत्रे यांना ‘आचार्य’ ही पदवी बहाल केली..
..महाराष्ट्रातील ह्या दोन महापुरुषांनी एकमेकांना बहाल केलेल्या ह्या चपखल पदव्या तेंव्हापासून त्यांच्या नावांपुढे कायमच्या जोडल्या गेल्या..
छायाचित्र
मुंबईतील नंतरच्या काळातील एका सभेत प्रसन्न मुद्रेने हास्यविनोद करताना..
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे..कॅाम्रेड मिरजकर..आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
Comments
Post a Comment