आम्ही जैन आहोत

 आम्ही जैन आहोत,

 आम्ही घरात मारवाडी भाषा बोलतो, पण बाहेर आम्ही सगळेच मराठी बोलतो. 

माझं १ ली ते १० पर्यतचं शिक्षण मराठी माध्यमात झालं. त्यामुळे मनात जो काही विचार येतो तो मी मराठीतून व्यक्त करते. 

मागच्या चार वर्षापासून अमराठी लोकांना मराठी भाषा शिकवते. चार वर्षात ३५० पेक्षा अधिक लोकांना उत्तम मराठी बोलायला शिकवले आहे. 

अनेकजण मला म्हणतात मॅडम तुम्ही मराठी नसून मराठी शिकवता हे कसं काय शक्य? 

मी त्यांना एकच उत्तर देते, मराठी माणूस हा जातीने, किंवा आडनावाने मराठी होत नाही, जन्माने आणि कर्माने मराठी होतो. 

आमच्या पाच पिढ्या महाराष्ट्रात राहतात, आम्ही बोलतो मराठी, वाचतो मराठी आणि शिकवतो देखील मराठी.

खालील फोटो- एका बॅंकेतील १५० कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचे ट्रेनिंग दिले होते त्यावेळीचा हा फोटो आहे. मागील वर्षी २५० लोकांना मी मराठी भाषा शिकवली आहे.

मराठी भाषेच मन हे राजासारखं आहे. ती सर्वांना आपलीशी करते. चला मराठी शिकूया

- सौ. भावना संचेती

Comments

Popular Posts